अनैतिक संबंधातून प्रेयसीच्या पतीला धमकी : पोलिस उपनिरीक्षक निलंबित
पुणे : खरा पंचनामा
अनैतिक संबंधावरुन प्रेयसीच्या घरात शिरुन तिच्या पतीला शिवीगाळ करुन कमरेच्या पिस्तुलाला हात लावून वे ठार मारण्याची धमकी पुणे शहर पोलिस दलातील एका पोलीस उपनिरीक्षकांनी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी प्रविण नागेश जर्दे या पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर त्या पोलिस उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे.
प्रविण जर्दे हा सध्या शिवाजीनगर कोर्ट आवार येथे नियुक्तीला आहेत. कोथरुडमधील शास्त्रीनगर येथील एका सोसायटीत ही घटना १९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता घडली होती. याप्रकरणी एका ४३ वर्षाच्या नागरिकाने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रविण जर्दे याचे फिर्यादी याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध आहेत.
तिने हे संबंध सोडून द्यावेत, यासाठी फिर्यादी तिला सांगत होते. तिने हे प्रविण जर्दे यांना सांगितले.
त्यावरुन प्रविण जर्दे त्यांच्या घरात शिरले आणि त्यांनी फिर्यादी, त्यांची आई व मुलांना शिवीगाळ करुन मारण्याची धमकी दिली. यापुढे तिला काही बोलला तर माझ्याशी गाठ आहे. तसेच त्यांनी कमरेच्या पिस्तुलाला हात लावून तुम्हा सर्वांना ठार मारुन टाकीन अशी धमकी दिली. यामुळे फिर्यादी व त्यांच्या घरचे घाबरुन गेले होते. शेवटी त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. कोथरुड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.