Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

शरद पवार यांच्या कुस्तीगीर परिषदेची संलग्नता रद्द!

शरद पवार यांच्या कुस्तीगीर परिषदेची संलग्नता रद्द!



मुंबई : खरा पंचनामा

एकीकडे अजित पवार यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू असताना शरद पवार यांना आणखी एक धक्का बसला आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष असलेल्या शरद पवार यांच्या परिषदेची भारतीय कुस्तीगीर परिषदेशी असलेली संलग्नता रद्द करण्यात आली आहे.

शरद पवार यांच्या संघटनेची संलग्नता असलेल्या भारतीय कुस्तीगीर महासंघाने महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची मान्यता रद्द केली आहे. त्यामुळे अनेक वर्ष अध्यक्षपद भूषविलेल्या शरद पवार यांना कुस्ती क्षेत्रात मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. 

उत्तर प्रदेश मधील लखनऊ येथे भारतीय कुस्तीगीर महासंघाची सर्वसाधारण सभा पार पडली या सभेपूर्वी महासंघाच्या कार्यकारणीची बैठक झाली. या बैठकीमध्ये शरद पवारांच्या कुस्तीगीर परिषदेला पाठवलेल्या नोटीसीवर चर्चा करण्यात आली त्यानंतर सर्वसाधारण सभेमध्ये पुन्हा यावर चर्चा करून शरद पवार यांच्या महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची संलग्नता रद्द करण्यात आली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.