जयंत पाटील यांचे गृहमंत्री फडणवीस यांना खुले आव्हान!
मुंबई : खरा पंचनामा
उध्दव ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्याला ठाणे येथे मारहाण झाल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा 'फडतूस गृहमंत्री' असा उल्लेख केला आहे. यावरुन ठाकरेंवर टीका होत आहे. त्यातच आता राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खुलं आव्हान दिलं आहे. पुढील 48 तासात ठाण्यातील पोलीस आयुक्त आणि अधिकाऱ्यांची बदली करुन दाखवा, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.
माध्यमांशी बोलताना जयंत पाटील म्हणाले, देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत. पण ठाणे जिल्हा आणि ठाणे शहर त्यांच्या अखत्यारीत येत नाही. सध्या ठाणे जिल्ह्यात कायद सुव्यवस्थेची परिस्थिती बाधतली, तर माझं देवेंद्र फडणवीस यांना आव्हान आहे. त्यांनी आज, उद्यापर्यंत किंवा पुढील 48 तासांत ठाणे शहरातल्या पोलीस आयुक्तांपासून सर्व पोलीस अधिकाऱ्यांची ठाणे शहराच्या बाहेर महाराष्ट्रात बदली करावी. असं केलं तरच महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांमध्ये खरंच दम आहे, असं आम्ही समजू.
तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दबावाखाली पोलीस खातं वागत नाही, यावर आम्ही विश्वास ठेऊ, असंही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.