पाण्याच्या इलेक्ट्रिक मोटार, ट्रॅक्टर ट्रॉली चोरणाऱ्यास अटक : सांगली एलसीबीची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
सांगली जिल्ह्यासह कर्नाटकातून पाण्याच्या इलेक्ट्रिक मोटार तसेच ट्रॅक्टर ट्रॉली चोरणाऱ्यास अटक करण्यात आली. सांगली एलसीबीच्या पथकाने लोढे (ता. तासगाव) येथे ही कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून चोरीच्या तीन इलेक्ट्रिक मोटार, एक ट्रॉली असा पावणेदोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.
अभिजित दिलीप मंडले (वय १८, रा. लोढे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी चोरीच्या गुन्ह्यातील संशयितांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी एक विशेष पथक तयार केले होते. खबऱ्याद्वारे माहितीच्या आधारे हे पथक तासगाव तालुक्यात मोटार आणि ट्रॉली चोरट्याचा शोध घेत होते.
त्यावेळी मंडले याने त्याच्या घरात इलेक्ट्रिक मोटार विक्रीसाठी ठेवल्याची माहिती पथकाला मिळाली. नंतर पथकाने त्याच्या घरी छापा टाकून चोरीतील मुद्देमाल जप्त केला. त्याबाबत त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर त्यावेळी येळावी येथील ओढा, तसेच सावर्डे येथून इलेक्ट्रिक मोटारी चोरल्याची कबुली दिली. तसेच लोकूर (कर्नाटक) येथून एक ट्रॅक्टरची ट्रॉली चोरल्याचीही कबुली दिली. त्यानंतर त्याला अटक करून चोरीच्या मोटारी, ट्रॉली जप्त करण्यात आली. त्याला तासगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाने सहायक निरीक्षक संदीप शिंदे, संदीप पाटील, आमसिद्धा खोत, आर्यन देशिंगकर, संकेत कानडे, सचिन कनप, कॅप्टन गुंडवाडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.