Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सर्व्हे काहीही असुदेत कर्नाटकात भाजपच नं1 : धुरीण लोकांचा दावा

सर्व्हे काहीही असुदेत कर्नाटकात भाजपच नं1 : धुरीण लोकांचा दावा



बेंगळुरू : खरा पंचनामा

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा सोमवारी शांत झाला. अनेक सर्व्हे कंपन्यांनी त्यांचे अंदाज व्यक्त केले आहेत. त्यामध्ये काँगेसला बहुमत मिळेल असे भाकीत वर्तवले जात आहे. मात्र बऱ्याच राजकीय धुरीणांनी कर्नाटकात भाजपच एक नंबरला राहील असे भाकीत वर्तवले आहे. 

गेल्या 15 दिवसांपासून कर्नाटकात प्रचाराचा धुरळा उडाला होता. सोमवारी प्रचाराची सांगता झाली. भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, स्मृती इराणी, नितीन गडकरी या केंद्रीय स्तरावरील नेत्यांसह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रचार केला.

तर काँग्रेसकडून सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी, राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही जोरदार प्रचार केला. त्यातच जेडीएसचे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी प्रचार संगतेवेळी काँग्रेसवर पहिल्यांदा टीका केली.

बजरंग दलावरील बंदीच्या काँग्रेसच्या मागणीवर भाजपने जोरदार निशाणा साधला आहे. शिवाय मुस्लिम आरक्षण याबाबतीत गृहमंत्री अमित शाह यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. विकासाच्या मुद्द्यावर जरी काँग्रेसने रान पेटवले असले तरी भाजपने लोकांची मने जिंकण्यात यश मिळवले असल्याची चर्चा आहे.

आज प्रचार संपल्यानंतर राजकीय धुरीणांनी, विश्लेषकानी सुरुवातीला काँग्रेसच्या बाजूने असलेले कौल मतमोजणीवेळी भाजपकडे झुकल्याची उदाहरणे दिली आहेत. त्यामुळे सर्व्हे काहीही सांगत असले तरी कर्नाटकात भाजप एक नं. चा पक्ष राहील असे त्यांचे म्हणणे आहे. प्रत्यक्षात निकालानंतरच कर्नाटकचे चित्र स्पष्ट होणार आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.