Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

डॉ. नितीन करीर यांची 'अर्थ' तर तुकाराम मुंडे यांची 'कृषी'कडे बदली राज्यातील वरिष्ठ 10 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

डॉ. नितीन करीर यांची 'अर्थ' तर तुकाराम मुंडे यांची 'कृषी'कडे बदली
राज्यातील वरिष्ठ 10 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या



मुंबई : खरा पंचनामा

राज्यात अनेक राजकीय घडामोडी होत असताना शिंदे-फडणवीस सरकारने बदल्यांचा धडाका सुरूच ठेवला आहे. सांगलीचे तत्कालीन मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी डॉ. नितीन करीर यांची अर्थ मंत्रालयात बदली करण्यात आली आहे. तर धडाकेबाज अधिकारी तुकाराम मुंडे यांची कृषी विभागात बदली करण्यात आली आहे. राज्यातील 10 वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश मंगळवारी काढण्यात आले आहेत.

सांगलीचे तत्कालीन मनपा आयुक्त मिलिंद म्हैसकर हे सध्या नागरी उड्डाण तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रधान सचिव म्हणून काम करीत होते. त्यांची सार्वजनिक आरोग्य विभागाकडे बदली करण्यात आली आहे. महाट्रांस्कोचे डी. टी. वाघमारे यांची गृह मंत्रालयात बदली करण्यात आली आहे. राधिका रस्तोगी यांची अल्पसंख्याक विकास विभागात तर डॉ. संजीव कुमार यांची महाट्रांस्कोमध्ये बदली करण्यात आली आहे.

श्रावण हर्डीकर यांची मुंबई महापालिका येथे तर जी. श्रीकांत यांची छत्रपती संभाजीनगर मनपाचे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सांगलीचे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांची राज्य शुल्क विभाग छत्रपती संभाजीनगर येथे नियुक्ती करण्यात आली आहे. पी. भिवा शंकर यांची शिर्डी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.