Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पोलिस, पत्रकारांची भीती घालून 10 लाखांची खंडणी मागितली : एकावर गुन्हा

पोलिस, पत्रकारांची भीती घालून 10 लाखांची खंडणी मागितली : एकावर गुन्हा



पुणे :  खरा पंचनामा

पोलिस व पत्रकारांची भिती घालुन तसेच सुसाईड नोट असलेल्या डायरीचा वापर करून 10 लाख रूपयाच्या खंडणीची मागणी केल्याप्रकरणी मानव विकास परिषदेचा प्रदेश अध्यक्ष संदिप सुदाम कुटे (रा. रांजणगाव, ता. शिरूर, जि. पुणे) याच्याविरूध्द शिरूर पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत कालुराम दशरथ मलगुंडे (वय 39, रा. ढोक सांगवी, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. हा गुन्हा शिरूर रामलिंग हद्दीत, रांजणगाव येथील हॉटेल संदीप आणि कारेगाव शिंदोडे येथे दि. 8 मे ते दि. 10 मे दरम्यान घडला.

दि. 8 मे 2023 रोजी 4 वाजण्याच्या सुमारास शिरूर येथील रामलिंग रोडवर फिर्यादी कालुराम मलगुंडे यांचा पुतण्या योगेश मलगुंडे यांच्या मैत्रीणीने राहत्या घरी गळफास घेवुन आत्महत्या केली होती. त्यावेळी संदीप कुटे तेथे मदतीसाठी गेला होता. त्याने मयत महिलेने लिहिलेली सुसाईड नोट असलेली डायरी ही महत्वाचा पुरावा असताना देखील ती स्वतःकडे ठेवली. ती डायरी पोलिसांना दिली असल्याची खोटी माहिती फिर्यादीला दिली. 

पोलिसांचे चोरून काढलेले फोटो त्याने फिर्यादीला पाठविले. तसेच पत्रकारांना मॅनेज करावे लागेल अशी भिती दाखवुन फिर्यादीला शिंदोडी येथे पत्रकाराकडे नेले. मात्र, संदीप कुटेने शिंदोडी गावाच्या अलिकडेच फिर्यादीला गाडीतून खाली उतरवले आणि पत्रकारांना भेटण्यासाठी तो गेला. तो पत्रकारांना भेटुन आला.

पोलिसांची व पत्रकारांची भिती घालुन तसेच सुसाईड नोट असलेल्या डायरीचा वापर करून त्याने सदरील डायरीमध्ये तुमच्या पुतण्या योगेश मलगुंडेचे नाव आहे असे सांगुन वेदांता हॉस्पीटलचे बील भरायचे आहे असे म्हणुन फिर्यादीकडून 30 हजार रूपये ऑनलाइन ट्रान्सफर करून घेतले. त्यानंतर संदीप कुटेने वेळावेळी फिर्यादीला व्हॉट्सअॅप कॉल करून योगेशला वाचवायचे असेल तर माझ्याकडे तात्काळ 10 लाख रूपये जमा करा असा तगादा लावला होता. आरोपी संदीप कुटेने वेळावेळी 10 लाखाची मागणी केल्याने फिर्यादी कालुराम मलगुंडे यांनी शिरूर पोलिस स्टेशन गाठले आणि फिर्याद दिली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.