कर्नाटकात काँग्रेसला स्पष्ट बहुमत, 124 जागांवर आघाडी
बंगळुरू : खरा पंचनामा
कर्नाटकात काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. सुरुवातीच्या निकालानुसार कर्नाटकात 224 जागांपैकी काँग्रेसने बहुमताचा आकडा गाठला आहे. तर भाजपाची पिछेहाट झाली असून त्यांना 65 जागांवर आघाडी मिळाली आहे. दुसरीकडे जेडीएसने 24 जागांवर झेप घेतली आहे. दरम्यान 5 अपक्षांनी काँग्रेसला पाठींबा जाहीर केला आहे.
कर्नाटकात काँग्रेसची सत्ता येणार हे आता जवळपास स्पष्ट झालं आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या सोबत त्यांनी एक कॅप्शनही लिहिला आहे. मी अजेय आहे, मला खूप भरवसा आहे, मी आज अजेय आहे, असं राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय.
तर काँग्रेस पक्षानेही एक व्हिडिओ शेअर केला असून भारत जोडो यात्रेचा हा व्हिडिओ आहे. 50 सेकंदाच्या या व्हिडिओत मागे एक म्यूझीक असून मै आज अजेय हू, असं वाक्य त्यावर टाकण्यात आलं आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी म्हणजे 10 मेला मतदान पार पडलं. यानंतर झालेल्य एक्झिट पोलमध्येही कर्नाटकात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येणार असल्याचं भाकीत वर्तवण्यात आलं होतं.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.