Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

15 हजारांची लाच घेताना एक्साईजचा दुय्यम निरीक्षक जाळ्यात

15 हजारांची लाच घेताना एक्साईजचा दुय्यम निरीक्षक जाळ्यात 



छत्रपती संभाजीनगर : खरा पंचनामा 

परमीट रूम, बिअर बारचे नूतनीकरण करून दिल्याचा मोबदला म्हणून 30 हजार रूपयाच्या लाचेची मागणी करून 15 हजार रूपयाची लाच घेणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क (एक्साईज) विभागाच्या दुय्यम निरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. 

संजय महादेव पवार (वय 46) असे लाच घेताना पकडलेल्या दुय्यम निरीक्षकाचे नाव आहे. तक्रारदार यांचे भोकरदन तालुक्यातील माहोरा येथे परमीट रूम, बिअर बार आहे. त्याचे नूतनीकरण करून दिल्याचा मोबदला म्हणून दुय्यम निरीक्षक संजय पवार यांनी सरकारी पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडे 30 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती 15 हजार रूपये घेण्याचे मान्य केले. 

तक्रारदारास लाच देण्याची इच्छा नसल्यानं त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. तक्रारीची पडताळणी करण्यात आली. सापळा लावण्यात आल्यानंतर दुय्यम निरीक्षक संजय पवार यांनी 15 हजार रूपयाची लाच घेतली. त्यांना रंगेहात पकडण्यात आले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.