Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'यूपीएससी'त 'सारथी'च्या 17 जणांचे यश!

'यूपीएससी'त 'सारथी'च्या 17 जणांचे यश! 



पुणे : खरा पंचनामा 

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) घेतलेल्या नागरी सेवा परीक्षा 2022 मध्ये छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था (सारथी) या संस्थेने यशाचा ठसा उमटवला आहे. 'सारथी'ने प्रायोजित केलेल्या तब्बल 17 उमेदवारानी युपीएसीच्या परीक्षेत यश मिळवले आहे, अशी माहिती सारथी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी दिली. 

सारथी संस्थेतर्फे युपीएससीच्या मुख्य परीक्षा आणि मुलाखत यासाठी एकूण 39 उमेदवारांना अर्थसाहाय्य देण्यात आले होते. यापैकी 17 उमेदवार यशस्वी ठरले आहेत. सारथीच्या यशाचा टक्का हा 50 टक्क्यांच्या जवळपास आहे. आता हे 17 उमेदवार प्रशासकीय सेवेत रूजू होण्यास सज्ज आहेत. 

सारथीच्या या 39 उमेदवारांपैकी प्रतिक अनिल जरड (पुणे), ऋषिकेश हनमंत शिंदे (सांगली), अर्पिता अशोक ठुबे (ठाणे), सोहम सुनील मांढरे (पुणे), मंगेश पिराजी खिलारी (अहमदनगर), सागर यशवंत खर्डे (अहमदनगर), आशिष अशोक पाटील (कोल्हापूर), शशिकांत दत्तात्रय नरवाडे (धाराशिव), स्वप्नील चंद्रकांत बागल (हिंगोली), लोकेश मनोहर पाटील (जळगाव), प्रतीक्षा संजय कदम (सातारा), मानसी नानाभाऊ साकोरे (पुणे), करण नरेंद्र मोरे (सातारा), शिवम सुनील बुरघाटे (अमरावती), शिवहार चक्रधर मोरे (नांदेड), राजश्री शांताराम देशमुख (अहमदनगर), महारुद्र जगन्नाथ भोर (अहमदनगर) या 17 उमेदवारांनी परीक्षेत यश मिळवले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.