Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

2024 नंतर ईडीकडे कोणाला पाठवायचे याची यादी तयार करतोय!

2024 नंतर ईडीकडे कोणाला पाठवायचे याची यादी तयार करतोय!



मुंबई : खरा पंचनामा 

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची ईडीकडून चौकशी होत आहे. जयंत पाटील आज ईडी कार्यालयात हजर राहून चौकशीला सामोरे जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना सूचक इशारा दिला आहे. 2024 नंतर ईडीच्या कारवाईला कुणाला पाठवायचे आणि किती तास बसवायचे याची यादी आम्ही तयार करत आहोत असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

संजय राऊत म्हणाले, विरोधकांवर केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर करुन दबाव टाकला जात आहे. आम्ही लढाई लढत आहोत. जयंत पाटील खंबीरपणे तपासाला सामोरे जात आहेत. राजकीय दबावाचे हे षडयंत्र आहे. काही गोष्टी आम्ही करत नाही, मान्य करत नाही त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन गुडघे टेकवायला लावतात. पण आम्ही ते करत नाही. 2024 नंतर ईडीच्या कारवाईला कुणाला पाठवायचे आणि किती तास बसवायचे याची यादी आम्ही तयार करत आहोत असं संजय राऊत म्हणाले.

दरम्यान आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. त्यांनी कार्यकर्त्यांना मुंबईत येवू नका असे आवाहन केले आहे. मात्र तरीदेखील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी पक्षाच्या मुंबईतील कार्यालय तसेच ईडीच्या कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने जमले आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.