Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

25 हजारांची लाच मागणाऱ्या एपीआयविरोधात गुन्हा

25 हजारांची लाच मागणाऱ्या एपीआयविरोधात गुन्हा



अहमदनगर : खरा पंचनामा 

गुन्ह्यामध्ये संशयिताना अटक न करता अटकपूर्व जामीन मंजूर करण्यासाठी मदत करण्याच्या मोबदल्यात 25 लाच मागणाऱ्या अहमदनगर येथील कोतवाली पोलिस ठाण्यातील एपीआय विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.

विवेक अशोक पवार असे गुन्हा दाखल झालेल्या एपीआयचे नाव आहे. गुन्ह्यात अटक न करता अटकपूर्व जामिनासाठी मदत करण्यासाठी तीस हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती पंचवीस हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले म्हणून या अधिका-यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार यांचा मावस भाऊ व त्याच्याबरोबर असलेले चौघांवर कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यामध्ये त्यांना अटक न करता अटकपूर्व जामीनसाठी मदत करण्याच्या मोबदल्यात तीस हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती पंचवीस हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले म्हणून हा गुन्हा दाखल करण्यात आला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.