Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

विट्याचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांना 2 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

विट्याचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांना 2 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडले
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई



सांगली : खरा पंचनामा

बांधकाम व्यावसायिकाची फाईल मंजूर करण्यासाठी 2 लाख रुपयांची लाच घेताना विटा नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना रंगेहात पकडण्यात आले. सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी दुपारी ही कारवाई केली.

विनायक विजय औंधकर (वय ४७, रा. मुख्याधिकारी निवास मायणी रोड विटा) असे पकडण्यात आलेल्या मुख्याधिकाऱ्यांचे नाव आहे.

तक्रारदार बांधकाम व्यावसायिक असून त्यांचे ५ मजली अपार्टमेंटचे बांधकाम परवान्याची फाईल मंजुर करण्यासाठी औंधकर यांनी तक्रारदार यांचेकडे अडीच लाख रुपयांची लाच मागितली. याप्रकरणी तक्रारदाराने सांगलीतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली होती. ब्युरोच्या कार्यप्रणालीप्रमाणे त्याची पडताळणी केल्यानंतर औंधकर यांनी फाईल मंजुर करण्यासाठी अडीच लाख रूपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती दोन लाख रूपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर मंगळवारी विटा नगरपरिषद या ठिकाणी सापळा लावला असता औंधकर यांना दोन लाखांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. औंधकर यांचेविरुध्द विटा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे.

ही कारवाई पोलिस उपअधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक दत्तात्रय पुजारी, अजित पाटील, सलिम मकानदार, प्रितम चौगुले, ऋषीकेश बडणीकर, सुदर्शन पाटील, रविंद्र धुमाळ, चंद्रकांत जाधव, वीणा जाधव, सिमा माने, चालक वंटमुरे यांनी केली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.