Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

लाच घेणाऱ्या विट्यातील मुख्याधिकाऱ्यांच्या घरी छापे विनायक औंधकर राहणार 3 दिवस पोलिस कोठडीत

लाच घेणाऱ्या विट्यातील मुख्याधिकाऱ्यांच्या घरी छापे
विनायक औंधकर राहणार 3 दिवस पोलिस कोठडीत



सांगली : खरा पंचनामा

विटा नगर परिषदेचे मुख्याधिकारी विनायक विजय औंधर (वय ४७) यास तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. लाचलुचपत विभागाच्या पथकाने त्याच्या घरावर छापेमारी केल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक संदीप पाटील यांनी दिली.

विटा येथील एक बांधकाम व्यावसायिक पाचमजली अपार्टमेंट बांधत होते. त्यांच्या बांधकाम परवान्यासाठी त्यांनी नगरपरिषदेकडे फाईल मंजुरीसाठी दिली होती. ती फाईल मंजूर करण्यासाठी मुख्याधिकारी औंधकर याने अडीच लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. याची सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागास तक्रार दाखल करण्यात आली. लाचलुचपतच्या पथकाने पडताळणी केली असता त्यात औंधकरने तक्रारदारांची बांधकाम परवान्याची फाईल मंजूर करण्यासाठी तडजोडीअंती दोन लाख मागितल्याचे निष्पन्न झाले. 

यानंतर तातडीने नगर परिषदेत सापळा लावण्यात आला. मुख्याधिकारी औंधकर याला तक्रारदार बांधकाम व्यावसायिकाकडून दोन लाख रुपये घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्याला आज बुधवारी न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तसेच त्याच्या घरावरही छापे टाकण्यात आले. पोलिस उपाधीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथक तपास करत आहेत. 

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.