संभाव्य पूरस्थिती हाताळण्यासाठी सांगली महापालिका सज्ज
34 ठिकाणी निवारा केंद्र तर हनुमाननगर मध्ये तात्पुरते हेलिपॅड उभारणार
सांगली : खरा पंचनामा
संभाव्य पूरस्थिती हाताळण्यासाठी महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे. पूर काळात एकूण 34 ठिकाणी निवारा केंद्र उभारली जाणार आहेत तर हनुमाननगरमध्ये स्केटिंग ट्रॅकचा तात्पुरते हेलिपॅड म्हणून वापर केला जाणार आहे. बुधवारी महापालिकेत महापौर दिग्विजय सूर्यवंशी, आयुक्त सुनील पवार आणि पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या संभाव्य आपत्ती निवारण तयारीचा आढावा घेतला.
यावेळी आपत्ती उद्भवल्यास त्यावर सामाजिक संस्था, नागरिक , लोकप्रतिनिधी यांच्या मदतीने त्यावर
मात करू असा विश्वास महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि आयुक्त सुनील पवार यांनी व्यक्त केला.
यावेळी आपत्ती व्यवस्थापन पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. प्रारंभी उपायुक्त राहुल रोकडे यानी प्रशासनाच्या तयारीची माहिती स्लाईड शोद्वारे सर्वांना दिली.
पूर भागातील जनावरे वेळीच स्थलांतरित करण्याबाबत सूचना देण्यात येत आहेत. पूर ओसरल्यानंतर साथ रोग पसरू नये म्हणून आवश्यक औषध साठा , औषध फवारणी तातडीने सुरू केली जाणार आहे तसे नियोजन केले आहे.
तसेच सांगलीवाडीला तात्पुरते अग्निशमन तळ सुरू करण्याबाबतही सूचना देण्यात आल्याचे आयुक्त सुनील पवार यांनी सांगितले.
महापालिकेत आयोजित बैठकीस उपमहापौर उमेश पाटील, सभागृह नेत्या भारती दिगडे, विरोधीपक्ष नेते संजय मेंढे, राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान, उपायुक्त राहुल रोकडे , नगर सचिव चंद्रकांत आडके यांच्यासह नगरसेवक, सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी नगरसेवक संतोष पाटील, मंगेश चव्हाण, युवराज बावडेकर, जमील बागवान , जगन्नाथ ठोकळे, फिरोज पठाण, नगरसेविका उर्मिला बेलवलकर, लक्ष्मी सरगर, नसीमा नाईक, सविता मदने आदींनी चर्चेत सहभाग घेतला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.