Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

4 वर्षांत महाराष्ट्राने गमावले 5 आमदार आणि 3 खासदार!

4 वर्षांत महाराष्ट्राने गमावले 5 आमदार आणि 3 खासदार! 



मुंबई : खरा पंचनामा 

चंद्रपुरचे काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर (वय ४७) यांचं नुकतेच निधन झालं. यानंतर राज्यातील पुन्हा एकदा तरूण खासदार गमावला असल्याची प्रतिक्रिया राज्यातील राजकीय वर्तुळातून वर्तवण्यात येत आहे. २०१९ नंतर महाराष्ट्राने ६ आमदार तर ३ खासदार गमावले आहेत. त्यांचं सरासरी ५५ ते ६० वयाच्या निधन झाल्याने राज्यात आता चिंता व्यक्त केली जात आहे. 

पंढरपुर-मंगळवेढा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांचे वयाच्या ६० व्या वर्षी नोव्हेंबर २०२० मध्ये निधन झालं होतं. ते सलग तीनवेळा विधानसभा आमदार होते. त्यांना ३० ऑक्टोबर रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. पुण्यात रूबी हॉलमध्ये त्यांचं निधन झालं होतं. त्यानंतर नांदेडमधील देगलूर-बिलोरी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापुरकर यांचंही कोरोनाने वयाच्या ५५ वर्षी निधन झालं. 

त्यानंतर कसबा पेठ मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांचं वयाच्या ५७ व्या वर्षी तर पिंपरी चिंचवडचे भाजपचेच आमदार लक्ष्मण जगताप यांचं दीर्घ आजाराने वयाच्या ६० व्या वर्षी निधन झालं होतं. २०२१ मध्ये काँग्रेसचे राज्यसभा खासदार आणि राष्ट्रीय राजकारणातील पक्षाचे अभ्यासू नेते राजीव सातव यांचंही पुण्यात ४६ व्या वर्षी निधन झालं. 

त्यानंतर पुणे लोकसभेचे भाजपचे खासदार गिरीश बापट यांचंही वयाच्या ७३ व्या वर्षी पुण्यात दीर्घ आजाराने निधन झालं. त्यानंतर आता चंद्रपुरचे काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांच वयाच्या ४७ व्या वर्षी निधन झालं आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.