Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील सीमावर्ती भागात 4 दिवस ड्राय डे!

सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील सीमावर्ती भागात 4 दिवस ड्राय डे!



सांगली : खरा पंचनामा

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सीमावर्ती भागात चार दिवस ड्राय डे घोषित करण्यात आला आहे. सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी तसेच कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी त्या त्या जिल्ह्यांसाठी हे आदेश दिले आहेत.

सांगली जिल्ह्याच्या कर्नाटक राज्याला लगत असलेल्या सीमावर्ती भागातील 5 किलोमीटर अंतरावर असलेली सर्व दारू दुकाने, परमिट रम बिअर बार, ताडी विक्रीची दुकाने, बिअर शॉपी तसेच अन्य सर्व प्रकारच्या दारू विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. दयानिधी यांनी दिले आहेत. सोमवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून बुधवारी रात्री 12 पर्यंत ही दुकाने बंद राहणार आहेत. तर मतमोजणी दिवशी म्हणजे दि. 13 मे रोजी संपूर्ण दिवसभर सीमावर्ती भागात दारू विक्री पूर्णपणे बंद राहणार आहे.

तर कोल्हापूर जिल्ह्याच्या कर्नाटक राज्याला लगत असलेल्या सीमावर्ती भागातील 5 किलोमीटर अंतरावर असलेली सर्व दारू दुकाने, परमिट रम बिअर बार, ताडी विक्रीची दुकाने, बिअर शॉपी तसेच अन्य सर्व प्रकारच्या दारू विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी रेखावार यांनी दिले आहेत. सोमवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून बुधवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत ही दुकाने बंद राहणार आहेत. तर मतमोजणी दिवशी म्हणजे दि. 13 मे रोजी संपूर्ण दिवसभर सीमावर्ती भागात दारू विक्री पूर्णपणे बंद राहणार आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.