Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कर्नाटक निवडणूक : कोल्हापूर परिक्षेत्रात 4.41 कोटींचा मुद्देमाल जप्त; 2890 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई, 88 लाखांची रोकड, 11 अग्निशस्त्रे जप्त विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांची माहिती

कर्नाटक निवडणूक : कोल्हापूर परिक्षेत्रात 4.41 कोटींचा मुद्देमाल जप्त; 2890 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई, 88 लाखांची रोकड, 11 अग्निशस्त्रे जप्त
विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांची माहिती



सांगली : खरा पंचनामा

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्रात 4.41 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये 88 लाखांची रोकड, 35 हजार लिटर दारू, सव्वा दोन लाखांचा गांजा, 3.25 कोटींचे रसायन, 5 लाखांची 11 पिस्तुल, गावठी कट्टे यांचा समावेश आहे. तर तब्बल 2 हजार 890 लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील सीमावर्ती भागात विविध ठिकाणी पोलिसांचे तपासणी नाके उभे करण्यात आले आहेत. सीमावर्ती भागातील सर्व पोलिस ठाण्यांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. सीमावर्ती भागातील महामार्ग, राज्य मार्ग, जिल्हा मार्ग तसेच अन्य मार्गांवर पोलिसांनी कडक वॉच ठेवला आहे. सीमावर्ती भागात तपासणी नाके उभे केले आहेत. कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिसांनी सीमावर्ती भागात गेल्या 15 दिवसात मोठी कारवाई केली आहे.

सोलापूर ग्रामीणच्या हद्दीत 88 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. 20.30 लाख रुपयांची 35 हजार लिटर दारू जप्त करण्यात आली आहे. गुटख्याची 2.33 लाख पाकिटे जप्त करून एक टेंपो, एक ट्रक, कार, 3 मोबाईल जप्त केले आहेत. 3.25 कोटी रुपयांचा दारुसाठी लागणारा कच्चा माल जप्त करण्यात आला आहे.

कोल्हापूर परिक्षेत्रात 7 केसेस करून 11 पिस्तुल, गावठी कट्टे, 4 कोयते असा 5.16 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सीआरपीसी 107 प्रमाणे 1 हजार 875 जणांवर, 108 प्रमाणे 7 जणांवर, 109 प्रमाणे 18, 110 प्रमाणे 86, 149 प्रमाणे 728, 144 प्रमाणे 89 असे तब्बल 2 हजार 890 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याचेही महानिरीक्षक फुलारी यांनी सांगितले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.