Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

महाराष्ट्रासह 5 राज्यांना नरेंद्र मोदी दर महिन्याला भेट देणार!

महाराष्ट्रासह 5 राज्यांना नरेंद्र मोदी दर महिन्याला भेट देणार! 



नवी दिल्ली : खरा पंचनामा 

पंतप्रधान नरेंद्र मोदी जूनपासून महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांना महिन्यातून किमान एकदा तरी भेट देतील. तसेच, सरकारी योजनांचे भूमिपूजन करण्याच्या निमित्ताने निवडणुकीचीही तयारी सुरू करणार आहेत, असे भाजपच्या सूत्रांनी सांगितले. 

मोदी सरकारला ३० मे रोजी नऊ वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२४ च्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. ३० मे ते ३० जून या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या सरकारच्या नऊ वर्षांच्या कार्यक्रमांमध्ये २०२४ च्या तयारीचा समावेश आहे. नोव्हेंबरमध्ये होऊ घातलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून त्यांनी वेगवेगळ्या विधानसभा निवडणुकांमुळे राज्यांमध्ये आपले कार्यक्रम निश्चित केले आहेत. 

उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या ८० जागा लक्षात घेऊन पंतप्रधान मोदी आता पूर्व उत्तर प्रदेशपासून सुरुवात करून दर महिन्याला एक किंवा दोन दिवस उत्तर प्रदेशात जातील. लोकसभेच्या जागांच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाचे राज्य असलेल्या महाराष्ट्रातील ४८ जागा लक्षात घेऊन पंतप्रधान मोदी पुढील महिन्यापासून प्रत्येक महिन्यात किमान एकदा तरी महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांशी चर्चा करून तारखा निश्चित करण्याचे काम सुरू आहे. 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हेही दर महिन्याला महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. जे. पी. नड्डा यांनी नुकताच दोन दिवसांचा महाराष्ट्र दौरा केला. बिहारमधील लोकसभेच्या ४० जागा लक्षात घेऊन पंतप्रधान मोदी केंद्रीय योजनांच्या निमित्ताने बिहारमध्ये जाण्यास सुरुवात करणार आहेत.


कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.