Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

इचलकरंजीसह राज्यातील 6 ठिकाणी लोकसभा निवडणूक लढवणार : राजू शेट्टी

इचलकरंजीसह राज्यातील 6 ठिकाणी लोकसभा निवडणूक लढवणार : राजू शेट्टी



सांगली : खरा पंचनामा

आगामी काळात होणाऱ्या लोकसभेच्या सहा जागांवर स्वाभिमानी शेतकरी संघटना निवडणुक लढवणार असल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली आहे. ते सांगलीत पत्रकारांशी बोलत होते. 

ते म्हणाले, सर्वांची ईडी चौकशी करा. माझ्या चौकशीचा विचार असेल तर त्यासाठी देखील मी तयार आहे असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी नमूद केले. तर लोकसभेत आम्ही कोणत्याही पक्षासोबत युती करणार नाही असेही राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले.

शेट्टी म्हणाले, राज्यात सहकार व अनेक क्षेत्रात मोठा भ्रष्टाचार सुरु आहे. ईडी चौकशी करायची असेल तर या सर्वांचीच करा, फक्त विरोधक आहेत म्हणून चौकशी करू नका असा टोला त्यांनी भाजप सरकाराला लगावला. यामध्ये माझीसुद्धा चौकशी करायची असेल तरी खुशाल करा. मात्र भाजपामध्ये येण्यासाठी दबाव तंत्र वापरू नका असेही राजू शेट्टी म्हणाले.

आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये स्वाभिमानी पक्ष कोणत्याही पक्षासमवेत युती करणार नाही. स्वाभिमानी पक्ष हा राज्यभरात सहा ठिकाणी लोकसभा निवडणूक लढणार आहे. यामध्ये मी स्वतः हातकणंगले मतदारसंघातून लढेन असेही राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.