Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

तपासाला जाण्यासाठी 7 हजारांची लाच घेताना एपीआय जाळ्यात!

तपासाला जाण्यासाठी 7 हजारांची लाच घेताना एपीआय जाळ्यात!



नाशिक : खरा पंचनामा

दाखल गुन्हयातील तपासकामी पुण्याला जाण्याकरिता 10 हजार रूपयाच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती 7 हजार रूपयाची लाच घेणाऱ्या सहाय्यक पोलिस निरीक्षकाला (एपीआय) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.

सागर गंगाराम डगळे असे त्या एपीआयचे नाव आहे. त्यांच्याविरूध्द सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर डगळे हे नाशिक शहरातील उपनगर पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. तेथे एक गुन्हा दाखल आहे. गुन्हयाच्या तपासासाठी पुण्याला जायचे असल्याने डगळे यांनी तक्रारदाराकडे 10 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.

प्राप्त तक्रारीची खातरजमा करण्यात आली. त्यानंतर सापळा रचला असताना सहाय्यक पोलिस निरीक्षक डगळे यांनी बुधवारी तडजोडीअंती सरकारी पंचासमक्ष तक्रारदाराकडून सिव्हील हॉस्पीटल बसस्टॉपच्या जवळील रोडवर 7 हजार रूपये घेतले. त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याविरूध्द सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.