Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कागलच्या एकाची 75 लाखांची फसवणूक : इचलकरंजीतील एकासह 8 जणांवर गुन्हा

कागलच्या एकाची 75 लाखांची फसवणूक : इचलकरंजीतील एकासह 8 जणांवर गुन्हा 



पुणे : खरा पंचनामा 

40 टक्के परतावा देण्याच्या आमिषाने कागल येथील एकाची 75 लाख रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील 7 जणांसह इचलकरंजीमधील एकाविरूध्द भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

गणेश रामचंद्र पडवळ, मयुर सतिश वांडरे, वसंत भागुजी दगडे, प्रशांत मारूती पायगुडे, गिरीश परळीकर, ज्ञानेश्वर खटावकर, ओंकार सतिश वांडरे (सर्व रा. पुणे), अरिहंत धनपाल कुपवारे (रा. इचलकरंजी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सतिश बाबुराव खोडवे (40, रा. कागल, जि. कोल्हापूर) यांनी फिर्याद दिली आहे. 

ऑगस्ट 2021 ते दि. 7 मार्च 2023 दरम्यान फास्टट्रॅक ट्रेडींग सर्व्हिसेस या कंपनीच्या आंबेगाव (पुणे) येथील कार्यालयात हा गुन्हा घडला. यातील संशयितांनी संगणमत करून 40 टक्के परताव्याचे आमिष दाखवुन खोडवे यांच्याकडून गुंतवणूक घेतली. खाडवे यांना गणेश पडवळ आणि मयुर वांडरे यांनी नोटरी स्टॅम्प करून देवुन त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी आंबेगाव येथे बोलावले.

त्यांच्याकडून मोठी गुंतवणूक घेतली मात्र त्यांना कुठल्याही प्रकारचा परतावा न देता त्यांची 75 लाख रूपयांची फसवणूक केली. याबाबत सुरूवातीला खोडवे यांनी कागल पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. मात्र हा गुन्हा भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला असल्यामुळे तो भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.