Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

गुंतवणूकदारांची 84 लाखाची फसवणूक : रिचआधारच्या महिलेसह चौघांना अटक

गुंतवणूकदारांची 84 लाखाची फसवणूक : रिचआधारच्या महिलेसह चौघांना अटक



सांगली : खरा पंचनामा

रिचआधार मल्टी ट्रेडर्स अँड डेव्हलपर्स एल. एल. पी. या कंपनीच्या माध्यमातून दीडपट व दुप्पट रक्कमचे आमिष दाखवून ८३ लाख ४८ हजार ५०० रूपयांची फसवणूक करणाऱ्या चौघांना अटक करण्यात आली. सांगलीच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली.

सतिश काका बंडगर, सौ. जयश्री सतिश बंडगर, संतोष काका बंडगर आणि अनिल मारुती आलदर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. रिचआधार मल्टीट्रेडर्स अँड डेव्हलेपर्स एल.एल.पी या कंपनीचा संचालक सतिश बंडगर याने गुंतवणूकदारांना १० महिने, २० महिने, २४ महिने ३६
महिन्यांच्या योजनेत रक्कम गुंतवणूक केल्यास जास्तीत जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवले. 

त्याच्यावर विश्वास ठेऊन फिर्यादीने २६ लाख रुपये रक्कम १० महिन्याच्या योजनेत गुंतवली. सतिश बंडगर व तिघांनी कसलाही परतावा न देता त्यांचा विश्वासघात केला. रक्कम वेळोवेळी मागणी करुनही टाळाटाळ करत २६ लाख रुपयांची फसवणुक केली. तसेच संतोष सुरवसे (रा. जवळा ता. सांगोला) यांची
२३ लाख ५० हजार रुपयांची, प्रविण कचरे (रा. श्रीपुर ता. माळशिरस) यांची ११ लाख २६ हजार  रुपयांची, सौ. संगिता नलवडे (रा. आमनापुर ता. पलुस) यांची ११ लाख १० हजार रुपयांची, सागर गोसावी (रा. अकलुज ता. माळशिरस) 
यांची ३ लाख ५ हजार रुपयांची आणि अनिल सुर्यवंशी (रा. लंगरपेठ ता. कवठेमहांकाळ) यांची ८ लाख ५७ हजार ५०० रुपयांची अशी फिर्यादी व ५ ठेवीदारांची मिळुन ८३ लाख ४८ हजार ५०० रुपयांची फसवणुक केली. 

याबाबत पोलीस अधीक्षक
डॉ. बसवराज तेली यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते. आर्थिक गुन्हे शाखेने तपास करून गुन्हा दाखल केला. गुन्हयातील संशयित सतिश बंडगर, सौ. जयश्री बंडगर, संतोष बंडगर आणि अनिल आलदर यांना अटक केली. 

आर्थिक गुन्हे शाखेकडील पोलीस निरीक्षक महेंद्र दोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुधाकर पाटील, सहायक अमोल लोहार, विनोद कदम, कुलदिप कांबळे, उदय घाडगे, दिपक रणखांबे, अनुराधा आवळे, दिपाली पाटील यांनी कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.