कर्नाटकात कोल्हापूर पॅटर्न : 9 जिल्ह्यांतून भाजप हद्दपार!
कोल्हापूर : खरा पंचनामा
कर्नाटकी जनतेने काँग्रेसला प्रचंड बहुमताने एकहाती सत्ता दिली. मात्र, भाजपला तब्बल 9 जिल्ह्यातून हद्दपार करुन टाकले आहे. ज्या ठिकाणांवर भाजपला मोठ्या अपेक्षा होत्या त्या ठिकाणीसुद्धा कर्नाटकी जनतेने भाजपला अस्मान दाखवले आहे. जुन्या मैसूरच्या मतदारांकडून भाजपला मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, तिथेही पराभव चाखावा लागला आहे. 2019 च्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातून भाजपचा एकही आमदार निवडून आला नव्हता. तोच पॅटर्न कर्नाटकात चालल्याची चर्चा आहे.
मध्य कर्नाटकमध्ये भाजपला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. नऊ जिल्ह्यांमध्ये भाजपला खाते सुध्दा उघडता आलेलं नाही, इतकी दूरवस्था मतदारांनी करुन टाकली आहे दुसऱ्या आठ जिल्ह्यांमध्ये केवळ एका स्थानावर समाधान मानावे लागले आहे. उर्वरित सात जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी दोन जागा जिंकल्या आहेत.
एकूण 24 जिल्ह्यांमध्ये भाजपची तीन भागांमध्येही खराब कामगिरी केली आहे. त्यामुळे पराभवाची व्याप्ती वाढली आहे. केवळ बंगळूर शहर, बेळगाव, बिदर, उडपी शहरांमध्ये भाजपला यश मिळाले आहे. चिकमंगळूर, बळ्ळारी, कोडगू या भाजपच्या बालेकिल्ल्यामध्येही दाणादाण झाली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.