Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

महाराष्ट्र दिन कार्यक्रमात होमगार्डला आली चक्कर!

महाराष्ट्र दिन कार्यक्रमात होमगार्डला आली चक्कर!



कोल्हापूर : खरा पंचनामा

कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त आज कोल्हापूरमध्ये ध्वज फडकावला. यावेळी दीपक केसरकर यांचे भाषण सुरू असतानाच परेडमधील होमगार्ड अचानक कोसळला. त्याला पोलीस व्हॅनमधून रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी

कार्यक्रमाच्या ठिकाणी डॉक्टरही उपस्थित होते, तसंच रुग्णवाहिका असूनही वेळेत होमगार्डला नेण्यासाठी न आल्याने पोलिसांच्या व्हॅनमधून रुग्णालयात नेण्याची वेळ आली. महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण आणि परेड पार पडली. परेड झाल्यानंतर पालकमंत्री दीपक केसरकर यांचे भाषण सुरू होते.

तेव्हा मैदानात उभा असणाऱ्या होमगार्डच्या तुकडीतील एक होमगार्ड जागेवरच कोसळला. मैदानावर रुग्णवाहिका आणि डॉक्टरांचे पथकही उपस्थित होतं, पण त्यांच्याकडून वेळेत मदत पोहोचली नसल्याने आपत्ती व्यवस्थापनाबाबत प्रश्न निर्माण होत आहे. अखेर पोलिस व्हॅनच्या मदतीने होमगार्डला रुग्णालयात नेण्यात आलं. मैदानावर त्याची प्रकृती जास्तच बिघडल्याचंही सांगितलं जातंय.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.