Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राज्यातील २० वाहन निरीक्षण, परीक्षण केंद्रासाठी ३६२ कोटींचा निधी मंजूर सांगलीसाठी १८.९५ तर कराडसाठी १०.४८ कोटींचा निधी

राज्यातील २० वाहन निरीक्षण, परीक्षण केंद्रासाठी ३६२ कोटींचा निधी मंजूर
सांगलीसाठी १८.९५ तर कराडसाठी १०.४८ कोटींचा निधी



सांगली : खरा पंचनामा

वाहनांच्या फिटनेस तपासणीसाठी अत्यंत आवश्यक असलेले वाहन निरीक्षण, परीक्षण केंद्र बऱ्याच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आता राज्यातील सुमारे वीस केंद्रांसाठी ३६२.५२ कोटी रूपयांचा निधी राज्य शासनाने मंजूर केला आहे. यामध्ये सांगली आणि कराड येथील केंद्रांचा समावेश आहे. सांगलीतील केंद्रासाठी १८.९५ कोटी तर कराड येथील केंद्रासाठी १०.४८ कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत. सांगलीत हे केंद्र व्हावे यासाठी गेल्या दोन वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता. या केंद्रासाठी आता निधी मंजूर झाल्याने वाहनधारकांतून समाधान व्यक्त केले जात आहे. 

सांगली, कराडसह अहमदनगर, धुळे, जळगाव, मालेगाव, अकलूज, गडचिरोली, उस्मानाबाद, वर्धा, भंडारा, गोंदिया, हिंगोली, पेण, यवतमाळ, जालना, सिंधुदुर्ग, नागपूर (पूर्व), नवी मुंबई (वाशी), वसई या ठिकाणी वाहन निरीक्षण, तपासणी केंद्र उभारण्यासाठी राज्य शासनाने निधी मंजूर केला आहे. राज्य शासनाचे अवर सचिव भरत लांघी यांच्या स्वाक्षरीने याबाबतचे आदेश शासनाने दिले आहेत. 

या सर्व केंद्रांसाठी पुण्यातील ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (ARAI) या संस्थेने राज्य शासनाकडे अंदाजपत्रक सादर केले होते. त्यासाठी ३६२.५२ कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या रस्ता सुरक्षा नियंत्रण समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. 

सांगलीतील केंद्रासाठी दोन वर्षांपासून पाठपुरावा
सांगलीत हे वाहन निरीक्षण, परीक्षण केंद्र होण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून पाठपुरावा करण्यात येत होता. सांगलीचे तत्कालीन आरटीओ विलास कांबळे यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी डॅ. अभिजित चौधरी पाटगाव (ता. मिरज) येथील चार हेक्टर जागा मंजूर केली. त्यानंतर मे २०२२ मध्ये तत्कालीन आरटीओ विलास कांबळे यांनी या केंद्रासाठीचा प्रस्ताव राज्य शासनाला दिला होता. तो प्रस्ताव तब्बल एक वर्षांनी मंजूर करण्यात आला असून सांगलीतील केंद्रासाठी १८.९५ कोटींचा निधी राज्य शासनाने मंजूर केला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.