Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कोठडीत संशयिताचा मृत्यू : पोलिस निरीक्षकाला अटक

कोठडीत संशयिताचा मृत्यू : पोलिस निरीक्षकाला अटक



अंबाजोगाई : खरा पंचनामा

पोलीस कोठडीत संशयिताच्या मृत्यू प्रकरणी परळीतील पोलीस निरीक्षक उमाकांत कस्तुरे यांना सीआयडीने अटक केली आहे. अंबाजोगाई न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

2014 मध्ये परळी पोलीस ठाण्याच्या कोठडीत चोरीच्या आरोपात अटक करण्यात आलेल्या एकाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणात पोलिसांच्या मारहाणीत सदर आरोपीचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता. हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. त्यावेळी सुध्दा या प्रकरणाची दखल घेण्यात आली होती. 

तत्कालीन पोलीस निरीक्षक उमाकांत कस्तुरे यांच्यावर या प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला होता. सीआयडीकडून गुन्हा दाखल झाल्यानंतर गुरुवारी सीआयडीने कस्तुरे यांना ताब्यात घेतलं. त्यांना अंबाजोगाई न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.