Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

समीर वानखेडे यांची बहीण, वडिलांचीही चौकशी होणार!

समीर वानखेडे यांची बहीण, वडिलांचीही चौकशी होणार!



मुंबई : खरा पंचनामा

अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन याच्या प्रकरणात सीबीआयने समीर वानखेडे यांची सलग दोन दिवस चौकशीदेखील केली. त्यानंतर आता सीबीआय समीर वानखेडे यांच्या कुटुंबियांची चौकशी करणार आहे. त्यांची बहीण आणि वडिलांकडे ही चौकशी करण्यात येणार आहे.

उद्या मंगळवारी सकाळी 10 वाजता समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे आणि त्यांची बहीण दोघेही सीबीआय कार्यालयात सीबीआय चौकशीसाठी जाणार आहेत. सीबीआयचे पथक दोघांचा जबाब नोंदवून घेणार आहे. त्यामुळे आता या प्रकरणात नेमक्या काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

विशेष म्हणजे सीबीआय अधिकारी या प्रकरणात चांगलेच ॲक्शन मोडवर आले आहेत. सीबीआयकडून गुन्हा दाखल झाल्यानंतर एका पथकाने थेट समीर वानखेडे यांचं मुंबईतील घर गाठत छापा टाकला. या छाप्यातून सीबीआय अधिकाऱ्यांना नेमकी काय माहिती मिळाली, याबाबतची सविस्तर माहिती समजू शकलेली नाही. पण वानखेडे यांच्याशी संबंधित आणखी काही ठिकाणी छापे टाकण्यात आले होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.