शिंदे गटाच्या खासदारांना हवंय भाजपचं तिकीट!
मुंबई : खरा पंचनामा
शिंदे गटातील खासदारांना भाजपाच्या तिकीटावर उभं राहायचं आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
ते म्हणाले यापूर्वी आम्ही ज्या लोकसभेच्या जागा लढवल्या होत्या, तेथील नेत्यांशी चर्चा करत आढावा घेण्याचं काम केलं. तसेच, एकनाथ शिंदे यांच्याबरोबर असलेले खासदार शिंदेंच्या तिकीटावर उभे राहण्यास इच्छूक नाहीत. बऱ्याच लोकांना भाजपाच्या तिकीटावर उभारण्याची इच्छा आहे. त्यामुळे शिंदे गटाची पंचायत झाली आहे. तसं झालं तर, एकनाथ शिंदेंबरोबर असलेला शिवसैनिक उद्धव ठाकरेंकडं जाण्याची शक्यता आहे, असं जयंत पाटल यांनी म्हटलं आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. याबद्दल विचारल्यावर जयंत पाटील म्हणाले, हा प्रश्न फडणवीसांना विचारला तर जास्त बरे होईल. मला याबद्दल काहीच माहिती नाही. ते का गेले? त्यांना राज ठाकरेंच्या मदतीची आवश्यकता आहे किंवा राज ठाकरेंशिवाय जमणार नाही, यांची उत्तर फडणवीस देतील.
महाविकास आघाडीची बैठक कधी होणार आहे? असं विचारल्यावर जयंत पाटलांनी म्हटलं की, "लवकरच महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. शिवसेना आणि काँग्रेसकडून चाचपणी करण्यात येत आहे. ती झाली की बैठक होईल असेही ते म्हणाले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.