Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कर्नाटक निवडणूक : सट्टा बाजारात काँग्रेस नंबर वन पण...

कर्नाटक निवडणूक : सट्टा बाजारात काँग्रेस नंबर वन पण... 



बंगळुरू : खरा पंचनामा 

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळणार, कोणाची सत्ता येणार याची उत्सुकता असतानाच सट्टेबाजांनी काँग्रेसवर पैसा लावला आहे. कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांसाठी बुधवारी मतदान झालं. या निवडणुकीत काँग्रेस सुमारे 120 ते 130 जागांसह मोठा विजय मिळवू शकते असा सट्टेबाजांचा अंदाज आहे. भाजप जास्तीत जास्त 80 जागा जिंकेल, तर जनता दल- सेक्युलरला अर्थात जेडीएसला 37 जागा मिळतील असा सट्टेबाजांचा अंदाज आहे. कॉंग्रेसला सर्वाधिक जागा मिळतील असा सट्टेबाज, बहुतांशी एक्झिट पोलचा अंदाज आहे. मात्र काँग्रेसला सरकार बनवण्यासाठी जेडीएसची मदत घ्यावी लागेल असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. 

हापूरच्या सट्टा बाजारानुसार काँग्रेसला 110 जागा मिळू शकतात, तर भाजपला 75 जागा मिळण्याची अपेक्षा आहे. तर फलोदी सट्टा बाजाराच्या अंदाजानुसार काँग्रेसला 137 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर भाजपला फक्त 5 जागा मिळण्याची शक्यता आहे. फलोदी बाजारने जनता दल-सेक्युलरला 30 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. 

पालनपुर सट्टा बाजाराच्या मते, काँग्रेसला 141 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर भाजपला 57 जागा मिळण्याचा अंदाज आहे. जेडीएलला 24 जागा मिळण्याची शक्यता आहे. एकूणच, 224 जागांच्या विधानसभेत काँग्रेसला 120 ते 130 जागा मिळण्याचा अंदाज सट्टा बाजाराने व्यक्त केला आहे. भाजपला 70 ते 80 जागा मिळू शकतात, असा सट्टेबाजांचा अंदाज आहे. 

आतापर्यंत घेण्यात आलेल्या एक्झिट पोलमध्येही काँग्रेसची कामगिरी चांगली राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विविध निवडणुकांमध्येही काँग्रेस भाजपपेक्षा पुढे असल्याचं दिसून येत आहे. एबीपी न्यूज-सी व्होटरने काँग्रेसला जास्तीत जास्त 112 जागा मिळतील म्हणजेच बहुमतापेक्षा एक जागा कमी मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. झी न्यूज मॅट्रीज 118 जागा, टाइम्स नाऊ-ईटीजी 113 जागा, TV9 भारतवर्ष-पोलस्ट्रॅट 109 जागा, रिपब्लिक टीव्ही-पी मार्क 108 जागा, सुवर्ण न्यूज-जन की बात 106 जागा. न्यूज नेशन-सीजीएसने काँग्रेसला सर्वाधिक 86 जागांचा अंदाज वर्तवला आहे. या पोलनुसार काँग्रेसला एकतर बहुमत मिळेल किंवा ते बहुमताच्या जवळ जाण्याची शक्यता आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.