Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

चोरी, घरफोडी करणाऱ्या तिघांची टोळी अटकेत, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त : सांगली एलसीबीची कारवाई

चोरी, घरफोडी करणाऱ्या तिघांची टोळी अटकेत, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त : सांगली एलसीबीची कारवाई



सांगली : खरा पंचनामा

मिरजेच्या ग्रामीण भागात चोरी, घरफोडी करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून दोन रिकामे सिलिंडर, 2 दुचाकी, मोबाईल, सोन्या-चांदीचे दागिने असा दीड लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली. दरम्यान त्याच्याकडून मिरजेच्या ग्रामीण भागातील एकूण 4 गुन्हे उघडकीस आल्याचे निरीक्षक शिंदे यांनी सांगितले.

अनिस अल्ताफ सौदागर (वय 26, रा. सुभाषनगर, मिरज), वसीम अल्लाबक्ष मुल्ला (वय 33, रा. संजय गांधी झोपडपट्टी, मिरज), गणेश विष्णू माने (वय 25, रा. भारतनगर, मिरज, मूळ रा. फुटका घाना, सावर्डे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी जबरी चोरी, घरफोडी, चोरी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार एलसीबीचे पोलिस निरीक्षक शिंदे यांनी सहायक पोलिस निरीक्षक संदीप शिंदे यांचे विशेष पथक तयार केले होते.

मिरज रेल्वे स्थानक रस्त्यावर बस स्थानकाजवळ तिघेजण चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी थांबाल्याची माहिती मिळाली. पथकाने सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी सुभाषनगर परिसरात घरफोडी करून दागिने, सिलिंडर चोरल्याची तसेच त्याच परिसरातून 2 दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून दीड लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांना मिरज ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

एलसीबीचे पोलिस निरीक्षक पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संदीप शिंदे, संदिप पाटील, मच्छिन्द्र बर्डे, संजय कांबळे, गौतम कांबळे, संकेत कानडे, आर्यन देशिंगकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.