Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

फायनान्स कंपनीची फसवणूक; साताऱ्यातील एकावर गुन्हा

फायनान्स कंपनीची फसवणूक; साताऱ्यातील एकावर गुन्हा 



सांगली : खरा पंचनामा

भारत फायनान्स इन्क्लुजन कंपनीच्या  जत शाखेत बचत गटातील ९ महिलाकडून परस्पर ४ लाख ६७ हजार ४७० रुपयांची मुदतपूर्व कर्जाची वसुली करूनही कंपनीत रक्कम भरणा न केल्याने एकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

रुपेश रमेश पोतदार (वय २९, रा. पाल ता. कराड जि. सातारा) असे फसवणूक करणाऱ्या संशयित आरोपीचे नाव आहे. भारत फायनान्स इन्क्लुजनचे शाखाधिकारी आजिम शेफी शेख यांनी याबाबत जत पोलिसांत फिर्याद दिली आहे. भारत फायनान्शिअल इन्क्लुजन या कंपनीची जत येथे शाखा कार्यरत आहे. ही कंपनी बचत गटांना अंतर्गत कर्ज वाटप करते. तसेच किरकोळ रिकरिंग ठेवी घेतल्या जात आहेत. दरम्यान या कंपनीकडे वसुली कर्मचारी म्हणून रुपेश पोतदार हा काम करत होता. संशयित पोतदारने मार्च २०२१ पासून कंपनीने बचत गटांना दिलेल्या कर्जाची वसुली करत होता. जत तालुक्यातील बचत गटातील ९ महिलाकडून ३५हजार ३०० रुपये व एका महिलेकडून आरडी रक्कम १ हजार ६०० वसूल केली आहे तसेच मुदतपूर्व कर्ज असतानाही बचत गटातील ३९ महिलाकडून ४लाख ४० हजार ५७० असे एकूण ४ लाख ६७ हजार ४७० इतकी रक्कम वसूल केली आहे. 

परंतु सदरची रक्कम कंपनीत न भरता परस्पर स्वतः घेतली आहे. याबाबत कंपनीच्या अधिकाऱ्यांनी अधिक पडताळणी केली असता पोतदार यांना वसूल केलल्या रकमेचा अपहार केल्याचे दिसून आले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.