Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सिद्धरामय्या होणार कर्नाटकचे मुख्यमंत्री : डिकेना उपमुख्यमंत्रीपद

सिद्धरामय्या होणार कर्नाटकचे मुख्यमंत्री : डिकेना उपमुख्यमंत्रीपद



नवी दिल्ली : खरा पंचनामा

अखेर कर्नाटकच्या पुढील मुख्यमंत्र्याच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. काँग्रेस हायकमांडने पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे कर्नाटकची कमान सोपवली आहे. सिद्धरामय्या हे दुसऱ्यांदा कर्नाटकचे मुख्यमंत्री होणार आहेत. तर डिके शिवकुमार यांना राज्याचे उपमुख्यमंत्री केले जाणार आहे. 20 मे रोजी बंगळुरू येथे शपथविधी सोहळा होणार आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी जाहीर झाला. मात्र, राज्याचा पुढील मुख्यमंत्री ठरवण्यासाठी काँग्रेसला चार दिवस लागले. खरे तर काँग्रेस हायकमांडने सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री बनवण्याचे ठरवले होते, परंतु शिवकुमार हे देखील इच्छुक असल्याने काँग्रेसला निर्णय घेण्यात उशीर लागल्याचे बोलले जात आहे.

काँग्रेसने हा निर्णय जाहीर करताच सिद्धरामय्या यांच्या समर्थकांनी जोरदार जल्लोष केला. त्यांच्या बेंगळुरू येथील निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांनी जोरदार पोस्टरबाजी देखील केली. यासोबतच सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांच्या घराबाहेरही सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

शिवकुमार यांना उपमुख्यमंत्रीपद तसेच प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदाची ऑफरही देण्यात आली होती, मात्र त्यांनी ती स्वीकारली नाही. तसेच काँग्रेस हायकमांडने सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांना पर्यायाने मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती. या अंतर्गत सिद्धरामय्या यांना पहिली दोन वर्षे आणि नंतर शिवकुमार यांना पुढील तीन वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद द्यायचे आहे, परंतु ही ऑफर दोघांनाही मान्य नव्हती.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.