Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

नशेखोर महिलेने केला तरुणाचा भोसकून खून!

नशेखोर महिलेने केला तरुणाचा भोसकून खून!



बेळगाव : खरा पंचनामा

नशेत तर्रर्र असलेल्या महिलेने मोबाईल मागण्याचे निमित्त करून तरुणाचा चाकूने भोसकून खून केला. घाव वर्मी लागल्याने तरुणाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास बेळगावमधील जुन्या पीबी रोडवरील कीर्ती हॉटेलजवळ ही घटना घडली. 

नागराज भीमशी रागीपाटील (वय 28, रा. तारीहाळ, ता. बेळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी जयश्री पवन वेसणेकर (वय 35, मूळ रा. दांडेली, सध्या रा. एपीएमसी कंग्राळी) या महिलेला अटक करण्यात आली आहे.

संशयित जयश्रीच्या पतीचे निधन झाले असून मुले परगावी शिकतात. तिला दारूचे व्यसन असून रविवारी ती भरपूर दारू प्यायली होती. सीबीटीकडून आरटीओ सर्कलमार्गे दोघे तरुण दुचाकीवरून चालले होते. नागेंद्र कोळी हा दुचाकी चालवत होता तर नागराज पाठीमागे बसला होता. कीर्ती हॉटेलजवळ जयश्री अचानक त्यांच्या दुचाकीसमोर आली व दोघांना अडवले. माझा मोबाईल दे, असे ती म्हणू लागली. चालक नागेंद्रने आमच्याकडे कुठला तुझा मोबाईल अशी विचारणा केली, तरीही ती या दोघांची दुचाकी सोडत नव्हती. त्यामुळे पाठीमागे बसलेला नागराज काहीसा चिडला व त्याने तुझा मोबाईल तुला माहिती आमच्याकडे नाही असे म्हटले. 

चिडलेल्या जयश्रीने साडीत लपवलेला चाकू काढला अन् नागराजच्या छातीवर वार केला. हा घाव वर्मी बसल्याने मोठा रक्तस्त्राव झाला. त्याला तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारावेळी त्याचा मृत्यू झाला. मार्केट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महिलेला ताब्यात घेतले. तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर रात्री उशिरा तिच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.