Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कळंबा जेलमध्ये गांजा, मोबाईल टाकण्याचा प्रयत्न करणारी आई, मुलगा ताब्यात

कळंबा जेलमध्ये गांजा, मोबाईल टाकण्याचा प्रयत्न करणारी आई, मुलगा ताब्यात



कोल्हापूर : खरा पंचनामा

कळंबा मध्यवर्ती कारागृहाच्या (जेल) भिंतीवरून शीतपेयाच्या रिकाम्या बाटलीतून गांजा, मोबाइल आणि अन्य अंमली पदार्थ टाकण्याचा प्रयत्न करणा-या आई आणि तिच्या मुलास कारागृह पोलिसांनी रंगेहाथ पकडून जुना राजवाडा पोलिसांच्या ताब्यात दिले. रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास हा प्रकार घडला. 

कोमल सुनील भोरे (वय ३८, रा. राजेंद्रनगर, कोल्हापूर) हिला पोलिसांनी अटक केली असून, तिच्या अल्पवयीन मुलाला सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. संशयित महिला कारागृहाच्या पूर्व बाजूला तटबंदीजवळ घुटमळत होती. तीन नंबरच्या सुरक्षा मनो-यावर कर्तव्य बजावत असलेले रक्षक अरुण बाबर यांनी महिलेच्या संशयास्पद हालचाली हेरल्या. ते तातडीने कारागृहाबाहेर तटबंदीजवळ गेले. त्याचवेळी भिंतीवरून बाटली आत फेकण्याचा प्रयत्न करणा-या महिलेला आणि तिच्या मुलाला रंगेहाथ पकडले.

संशयित महिला कोमल भोरे आणि तिच्या मुलाकडून जप्त केलेल्या बाटलीतून २३५ ग्रॅम गांजा, एक मोबाइल आणि पांढ-या रंगाचा अंमली पदार्थ मिळाला. जप्त केलेल्या मुद्देमालासह महिलेला जुना राजवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. अल्पवयीन मुलाची रवानगी सुधारगृहात करण्यात आली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.