Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

चोरीतील संशयिताची पोलिस कोठडीत गळफासाने आत्महत्या

चोरीतील संशयिताची पोलिस कोठडीत गळफासाने आत्महत्या 



पुणे : खरा पंचनामा 

पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या पोलीस कोठडीत चोरीच्य गुन्ह्यात अटक केलेल्या संशयिताने गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. 

शिवाजी उत्तम गरड असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. शिवाजी गरड याला वाहनचोरीच्या गुन्ह्यात रोजी अटक केली होती. तपासानंतर त्याला मंगळवारी रात्री विश्रामबाग पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. त्याला झोपण्यासाठी दिलेल्या चादरीचा काठ फाडून त्याची दोरी तयार केली. सकाळी तो बाथरुममध्ये गेला. तेथील जाळीला त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर खूप वेळाने त्याने आत्महत्या केल्याचे आढळले. 

पोलीस कोठडीत एखाद्याचा मृत्यु झाल्यास त्याचा तपास सीआयडीकडे दिला जातो. त्याप्रमाणे या घटनेची माहिती सीआयडीला देण्यात आली आहे. तसेच मृतदेहाची उत्तरीय तपासणी तहसीलदारांच्या उपस्थितीत, व्हिडिओ शुटिंग करुन केली जाते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.