Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीत अट्टल दुचाकी चोरट्यास अटक : चार दुचाकी जप्त

सांगलीत अट्टल दुचाकी चोरट्यास अटक : चार दुचाकी जप्त



सांगली : खरा पंचनामा

सांगलीवाडीत एका अट्टल दुचाकी चोरट्यास अटक करण्यात आली. त्याच्याकडून चोरीच्या चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. सांगलीतील तीन तर मिरजेतील एक असे चार गुन्हे उघडकीस आणण्यात सांगली शहर पोलिसांना यश आल्याची माहिती पोलिस निरीक्षक अभिजित देशमुख यांनी दिली. 

सौरभ राजेंद्र इंगळे (वय २२, रा. मेंढे मळा, मिरज) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी दुचाकी चोरट्यांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शहरचे निरीक्षक देशमुख यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला चोरट्यांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. शुक्रवारी मध्यरात्री सांगलीवाडी येथील कदमवाडी रस्त्यावर एक तरूण दुचाकी घेऊन संशयास्पदरित्या उभा असल्याची माहिती पथकाला मिळाली. 

त्यानंतर पथकाने सापळा रचून इंगळे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील दुचाकीबाबत चौकशी केल्यानंतर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केल्यानंतर त्याने सांगली आणि मिरजेतून चार दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून सव्वा लाख रूपयांच्या चोरीच्या चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. 

सांगली शहरचे पोलिस उपअधीक्षक अजित टिके, निरीक्षक अभिजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महादेव पोवार, विनायक शिंदे, झाकीर काझी, अभिजित माळकर, आरिफ मुजावर, सचिन शिंदे, संदीप पाटील, अमित मोरे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.