शपथविधीला गुरुवारचा मुहूर्त : मुख्यमंत्री पदासाठी नावाचा सस्पेन्स कायम!
बंगळुरू : खरा पंचनामा
कर्नाटकात सत्तास्थापनेच्या हलचालींना वेग अला असून मुख्यमंत्री पद कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ गुरुवारी शपथ घेणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.
गांधी कुटुंबीय आणि राष्ट्रीय काँग्रेसचे प्रमुख मल्लिकार्जुन खरगे या शपथविधी कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. काँग्रेसने शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी सर्व 'समविचारी' पक्षांना देखील निमंत्रण पाठवले आहे. कर्नाटक मंत्रिमंडळाची अंतिम रूपरेषा एक-दोन दिवसांत आकार घेईल, असे सांगण्यात येत आहे.
2018 च्या निवडणुकीत भाजपने 104 जागा जिंकल्या होत्या त्यावरून पक्षाच्या आमदारांची संख्या 66 पर्यंत खाली आली आहे. एसटी प्रवर्गासाठी राखीव असलेली एकही जागा त्यांना जिंकता आली नाही. कर्नाटकात 51 राखीव मतदारसंघ आहेत, त्यापैकी 36 SC उमेदवारांसाठी आणि 15 ST उमेदवारांसाठी आहेत.
काँग्रेस विधिमंडळ पक्ष (सीएलपी) मुख्यमंत्री निवडीचा निर्णय घेण्यासाठी आज बैठक सुरू आहे. या बैठकीत सर्व आमदारांचे मत जाणून घेण्यात येणार आहे. त्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, तीनही निरीक्षक हाय कमांडशी चर्चा करतील. त्यानंतर मुख्यमंत्री पदाचे नाव निश्चित केले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.