'रयत'च्या पदयात्रेमुळे महामार्गावरील वाहतूक धीम्या गतीने
सातारा : खरा पंचनामा
रयत क्रांती संघटनेच्या वतीने सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाला "वारी शेतकऱ्यांची" पदयात्रा आज गुरुवारी सातारा पोलीसांनी पुणे बंगळूर महामार्गावर अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिस दल आणि सदाभाऊ खोत यांच्यात थोड्याफार प्रमाणात बाचाबाची झाली. दरम्यान रयत क्रांतीच्या पदयात्रेमुळे सातारहून पुण्याला जाणारी महामार्गावरील वाहतुक धिम्या गतीने सुरु होती.
शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रयत क्रांती संघटनेच्या वतीने 22 मे पासून कराड ते सातारा यादरम्यान वारी शेतकऱ्यांची ही पदयात्रा काढण्यात येत आहे. आमच्या मागण्यांवर आणि प्रश्नांवर राज्य शासनाने निर्णय न घेतल्यास ही वारी मुंबई पर्यंत काढणार असल्याचा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला होता.
या वारीचा आज चौथा दिवस असून सातारा पोलीस प्रशासनाने खोत यांची पुणे बंगळूर महामार्गावर जाऊन भेट घेत पदयात्रा थांबविण्याची विनंती केली. परंतु खोत यांनी आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही अशी भूमिका घेतली. दरम्यान या मोर्चामुळे महामार्गावरील वाहतुक धिम्या गतीने सुरु होती. आज दुपारी सातारा येथे सभा घेऊन पुढील दिशा ठरवली जाईल अशी माहिती खोत यांनी माध्यमांना दिली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.