Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा उद्या निकाल : सरन्यायाधीश

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा उद्या निकाल : सरन्यायाधीश



नवी दिल्ली : खरा पंचनामा

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल उद्या गुरुवारी जाहीर होणार आहे, सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी ही माहिती दिली आहे. महाराष्ट्रातील शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्दयावर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाकडून निर्णय जाहीर केला जाणार आहे.


सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले, "उद्या घटनापीठाकडून महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल तसेच दिल्ली सरकार आणि नायब राज्यपाल यांच्यातील खटल्यावरही अंतिम निकाल दिला जाणार आहे. दिल्लीच्या राज्यपालांकडून वारंवार प्रशासकीय कामात हस्तक्षेप केला जात असल्याचं हे प्रकरण आहे, असं 'लाईव्ह लॉ' नं म्हटलं आहे.

11 महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत जात नवं सरकार स्थापन केलं. या सरकारचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. दरम्यान, शिवसेनेचा व्हिप न पाळल्याप्रकरणी तत्कालीन पीठासीन अधिकारी नरहरी झिरवळ यांनी शिवसेनेच्या १६ आमदारांना अपात्रतेची नोटीस पाठवली होती. यानंतर हा विषय सुप्रीम कोर्टात पोहोचला.

दरम्यान, शिवसेना नक्की कोणाची? हा मोठा पेच निर्माण झाला होता. या काळात अंधेरीची पोटनिवडणूक लागल्यानं यासाठी निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट अशा शिवसेनेच्या दोन गटांना तात्पुरती मान्यता दिली होती. या निवडणुकीसाठी ठाकरे गटाला 'उद्धव बाळासाहेब ठाकरे' या नावासह 'मशाल' हे चिन्ह दिलं होतं. तर एकनाथ शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवेसना' आणि 'ढाल-तलवार' हे चिन्ह दिलं. त्यानंतर अनेक घडामोडींनंतर निवडणूक आयोगानं अंतिम निकाल देत एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा गट हाच मूळ शिवसेना असल्याचं घोषीत केलं आणि त्यांना धनुष्यबाण हे चिन्हंही बहाल केलं. यानंतर उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.