Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

दरोडा टाकणाऱ्या टोळीवर मोकाअंतर्गत कारवाई विषेश पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांची मंजुरी

दरोडा टाकणाऱ्या टोळीवर मोकाअंतर्गत कारवाई
विषेश पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांची मंजुरी



सांगली : खरा पंचनामा

सांगली शहर परिसरात दरोडा टाकणाऱ्या अहमदनगर, औरंगाबाद जिल्ह्यातील गुन्हेगारी टोळीवर मोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सांगली पोलिसांनी याबाबत पाठवलेल्या प्रस्तावाला कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी मान्यता देत तो प्रस्ताव मंजूर केला आहे.

अनिल ऊर्फ अन्या युवराज पिंपळे (वय ४९, रा. अशोकनगर, ता. श्रीरामपूर, जि. अहमदनर), तुकाराम भिमराव घोरपडे (वय ५४, रा. उंडेवस्ती मातापुरता श्रीरामपुर, जि. अहमदनगर), दाजी धनराज सोळंके (वय ३६, रा. हरसुल गायरान न. १ लासुनरता, गंगापुर जि. औरंगाबाद), यांना दरोड्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. या तिघांसह या गुन्ह्यात फरारी असलेले लाला ऊर्फ लालचंद ऊर्फ लालसिंग चंदन सोळंके (रा. द्वारकानगर, पाडेगाव, औरंगाबाद), कोंडीलाल काळे, वयवयी काळे, बंदु पिंपळे, काना अंकुश पवार (रा. कन्हेटाकळी ता. शेवगाव जि. अहमदनगर) यांच्यावर मोकाची कारवाई करण्यात आली आहे.

अनिल ऊर्फ अन्या युबराज पिंपळे व टोळीतील सर्व सदस्य स्वतःच्या उपजिवीकेसाठी कोणताही कायदेशीर समाजमान्य कामधंदा करीत नाहीत. या टोळीचे कार्यक्षेत्र महाराष्ट्रातील सांगली, सातारा, रायगड, नागपूर, अहमदनगर, लातुर, औरंगाबाद तसेच छत्तीसगड राज्यातील धमतरी जिल्ह्यामध्ये आहे. या टोळीने २००१ पासुन २०२२ पर्यंत सतत गुन्हयांची मालिका केली आहे. 

या टोळीने टोळीचे वर्चस्व टिकविण्यासाठी व आर्थिक फायदयासाठी व इतर लाभ मिळवण्यासाठीच्या उद्देशाने संघटित गुन्हेगारी प्रमुख म्हणुन किंवा संघटनेच्या वतीने एकट्याने किंवा संयुक्तपणे दहशत व हिंसाचाराचा उपयोग करुन घातक हत्यारे जवळ बाळगून खुनाचे प्रयत्नासह दरोडा टाकणे, दरोडा टाकणे, जबरी चोरी करणे, चोरी करणे, प्राणघातक हत्यारनिशी जबरी चोरी/दरोडा घालण्याचा प्रयत्न करणे, रात्रीचे वेळी घरफोडी करणे असे गंभीर गुन्हे केलेले आहेत. हे गुन्हे या टोळीने स्वतःचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी व आर्थिक फायद्यासाठी केलेले आहेत. ही टोळी आर्थिक फायद्याचे जोरावर परिसरात वर्चस्व प्रस्थापित करीत आहे. या टोळीने त्याची दहशत निर्माण केलेली आहे असे पोलिस तपासात निष्पन्न झाले.

त्यामुळे या टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii). ३ (२), ३(४) ४ अन्वये वाढीव कलमे लावुन तपास करणेबाबतचा प्रस्ताव सांगली शहरचे पोलिस निरीक्षक अभिजित देशमुख यांनी पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांचेकडे सादर केला होता. डॉ. तेली यांनी प्रस्तावाचे अवलोकन करुन विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांचेकडे मोक्का कायद्यान्वये तपास करणेची मंजुरी मिळण्यासाठी सदरचा प्रस्ताव पाठविला होता. विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी सदर प्रस्तावाचे अवलोकन करुन मोक्का कायद्यान्वये तपासाची मंजुरी दिली आहे.

या गुन्हयाचा पुढील तपास सांगली शहरचे पोलिस उपअधीक्षक अजित टिके करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सिद्धाप्पा रुपनर, दिपक गट्टे तसेच सांगली शहरचे पोलीस निरीक्षक अभिजित देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक समीर ढोरे, रफिक मुलाणी, गणेश कांबळे यांनी केली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.