Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

आताही काही प्रस्थापित माजलेले : संभाजीराजे

आताही काही प्रस्थापित माजलेले : संभाजीराजे



पुणे : खरा पंचनामा

छत्रपती शिवाजी महाराजांनी पुण्यात स्वराज्य स्थापन केले. त्यावेळी तेव्हाचे प्रस्थापित लोक हे कधीच महाराजांसोबत नव्हते. आताची परिस्थितीसुद्धा वेगळी नाही. आताही काही प्रस्थापित हे माजलेले दिसत आहेत. सध्या तेच राजकारणी, तीच चर्चा, तेच खोटं बोलणं हे चालू आहे. यापुढे हे चालणार नाही. सामान्य, शेतकरी, कष्टकरी यांना ताकद देण्याचे काम करायचे आहे. त्यामुळे स्वराज्य संघटना ही शेतकरी, कामगार, सहकार, शिक्षण आणि आरोग्य या पंचसूत्रीच्या माध्यमातून सामान्यांचा विकास करणार आहे, असे प्रतिपादन स्वराज्य संघटनेचे प्रमुख, माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी शनिवारी पुण्यात एका जाहीर कार्यक्रमात बोलताना केली.

ते म्हणाले, सत्तेतून सुराज्य निर्माण करता यावे. जेणेकरून शिवाजी महाराजांचे स्वप्न पूर्ण होऊ शकेल. यासाठी स्वराज्य संघटना येत्या २०२४ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा संभाजीराजे यांनी यावेळी केली.

या निवडणुकीच्या तयारीसाठी आतापासूनच कामाला लागा, असा आदेश त्यांनी यावेळी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला. आज संभाजीराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वराज्य या संघटनेच्या 'स्वराज्य भवन' या कार्यालयाचे लोकार्पण सर्वसामान्य नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर या संघटनेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन घेण्यात आले.

या अधिवेशनात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी संयोगिताराजे, छत्रपती शहाजीराजे संघटनेचे सरचिटणीस डॉ. धनंजय जाधव, संपर्कप्रमुख करण गायकर आदी उपस्थित होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.