Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कोल्हापुरात लूटमार करणाऱ्या दोघांना अटक, रोकड, मोबाईल, मोपेड जप्त

कोल्हापुरात लूटमार करणाऱ्या दोघांना अटक, रोकड, मोबाईल, मोपेड जप्त



कोल्हापूर : खरा पंचनामा

शहरातील शाहू मिल परिसरात दुचाकीस्वाराला लिफ्ट मागून मध्यरात्री निर्जन स्थळी एकाला मारहाण करत धमकी देत त्याचा मोबाईल, रोकड लंपास करण्यात आली. याप्रकरणी दोघांना अटक करून त्यांच्याकडून रोकड, मोबाईल, मोपेड असा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे यांनी दिली.

सागर भगवान गणाचार्य (वय २४, रा. राजारामपुरी ४ थी गल्ली, कोल्हापूर), अक्षय धनाजी भाले (वय २५, रा. राजारामपुरी ५ वी गल्ली, कोल्हापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. चार दिवसांपूर्वी एकजण दुचाकीवरून निघाला होता. त्यावेळी एका संशयिताने त्याच्याकडे लिफ्ट मागितली. शाहू मिल परिसरात गेल्यावर लिफ्ट मागणाऱ्याने दुचाकी थांबवण्यास सांगितले. त्यावेळी तेथे दुसरा संशयित मोपेडवरून आला. दोघांनी त्याला मारहाण करून धमकी देत त्याच्याकडील रोकड, मोबाईल काढून घेतला.

राजारामपुरी पोलिस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखा त्यांचा शोध घेऊन दोघा संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांना अटक करून त्यांच्याकडून चोरलेली रोकड, मोबाईल तसेच गुन्ह्यात वापरलेली मोपेड जप्त करण्यात आली आहे.

पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक भगवान शिंदे, अमर आडुळकर, विशाल खराडे, प्रविण पाटील, विशाल शिरगांवकर, अविनाश तारळेकर, रविकुमार आंबेकर, संदिप सावंत, सत्यजीत सावंत यांनी ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.