Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सोलापूरमधील सराईत चोरट्याला अटक : अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

सोलापूरमधील सराईत चोरट्याला अटक : अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त



सांगली : खरा पंचनामा

सांगली शहरात विविध ठिकाणी घरफोड्या करणाऱ्या सोलापूर येथील अट्टल चोरट्यास अटक करण्यात आली. त्याच्याकडून सहा घरफोड्या उघडकीस आल्या आहेत. पोलिसांनी त्याच्याकडून २ लाख ४२ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

बाबु काजाप्पा मुंगली (वय 27, रा. मजेरवाडी, सोलापूर ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. सांगली शहरात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. चोरट्याच्या शोधासाठी पोलिसांनी गस्त वाढवली होती. तसेच विश्रामबाग परिसरात कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले होते. विश्रामबाग पोलिसांनी त्रिमुर्ती कॉलनी परिसरात एकजण संशयास्पदरित्या फिरताना आढळून आला. 

पोलिसांनी त्याला ताब्यात घेवून त्याच्या सॅकची तपासणी केली असता त्यामध्ये स्क्रू ड्रायव्हर, कटावणी, एक्सा ब्लेड, हातोडा आढळला. चौकशीत त्याने सहा घरफोड्यांची कबुली दिली. बाबु मुंगली याच्यावर सोलापूर पोलीस ठाण्यात चोरी आणि घरफोडीचे गुन्हे दाखल असून तो सराईत गुन्हेगार आहे. पोलिसांनी त्याच्याकडून सोने-चांदीचे दागिने तसेच मोटरसायक, मोबाईल आणि गुन्ह्यात वापरण्यात येणारे साहित्य असा २ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

विश्रामबागचे पोलिस निरिक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अमितकुमार पाटील, अनिल ऐनापुरे, संदिप घस्ते, आदिनाथ माने, महंमद मुलाणी, विलास मुंढे, दरीबा बंडगर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.