Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पंतप्रधान मोदी यांनी दिल्या काँग्रेसला विजयाच्या शुभेच्छा!

पंतप्रधान मोदी यांनी दिल्या काँग्रेसला विजयाच्या शुभेच्छा!



नवी दिल्ली : खरा पंचनामा 

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल आता स्पष्ट झाला आहे. या निवडणुकीमध्ये काँग्रेसने एक हाती सत्ता राखली आहे. भाजपला कर्नाटकमध्ये मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र त्यांना त्या ठिकाणी मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले.

कर्नाटकाच्या या निकालावरून आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे. "कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन. लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी माझ्या त्यांना शुभेच्छा" असे ट्विट केले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.