Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अमृता फडणवीस यांना लाचेचे आमिष : जयसिंगानीच्या घरावर गुजरात ईडीचा छापा

अमृता फडणवीस यांना लाचेचे आमिष : जयसिंगानीच्या घरावर गुजरात ईडीचा छापा



उल्हासनगर : खरा पंचनामा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना १ कोटी रुपयांच्या लाचेचे आमिष दाखवून ब्लॅकमेलिंग प्रकरणी गुजरात ईडीच्या पथकाने मंगळवारी दुपारी उल्हासनगर येथील अनिल जयसिंगांनी यांच्या घराची झाडाझडती घेऊन घरावर नोटिस चिटकवली.

उल्हासनगरातील क्रिकेट बुकी अनिल जयसिंगांनी यांच्या अनिष्का या मुलीने फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना मॉडेलिंग असल्याचे भासवून मैत्री करण्याचा प्रयत्न केला. यातूनच १ कोटीच्या लाचेचे आमिष दाखवून ब्लॅकमेलिंग केल्या प्रकरणी अनिष्का व अनिल जयसिंगांनी यांच्या विरोधात मुंबई येथे गुन्हा दाखल झाला. 

मुंबई पोलिसांनी अनिष्काला अटक केल्यानंतर, काही दिवसातच गुजरात मधून अनेक वर्षापासून विविध गुन्हयात फरार असलेल्या अनिल जयसिंगांनी यालाही अटक केली. पोलीस चौकशीत मोठा घोळ आढळल्याने, ईडीची कारवाई सुरू झाली. उल्हासनगर कॅम्प नं-१ येथील अनिल जयसिंगानी यांच्या घरी मंगळवारी दुपारी गुजरात ईडी पथकासह इतर विभागाची पथके दाखल झाली. पथकाने घराची झाडाझडती घेतल्यानंतर, घराच्या दरवाज्यावर एक नोटीस चिटकवली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.