Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कुरुलकरच्या चार पिढ्या आरएसएसशी संलग्न!

कुरुलकरच्या चार पिढ्या आरएसएसशी संलग्न! 



मुंबई : खरा पंचनामा 

हनीट्रॅप प्रकरणात अडकलेले डीआरडीओचे शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर सांगतात की, त्यांचे चार पीढ्या आरएसएशशी सलग्न आहेत, यावर संघाने उत्तर दिलं पाहिजे अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. 

पटोले म्हणाले की, "कुरुलकर हे आरएसएसशी संबंधीत आहेत. आरएसस हे वैचारिक संस्था आहे. अशा पध्दतीने आरएसएसचा व्यक्ती देशाची माहिती पाकिस्तान या शत्रूराष्ट्राला देत असेल तर यावर आरएसएसने उत्तर दिलं पाहिजे." "आरएसएसवाले आमचा काही संबंध नाही असे सांगतात. कुरुलकर जो आरएसएससाठी भाषण करत होता, तो स्वतः सांगतोय की माझी चौथी पीढी आहे जी आरएसएसशी जोडली गेलेली आहे आणि आता आरएसएसकडून उत्तर येतंय की, त्याचा आणि आमचा संबंधच नाही. नेमकं काय वास्तविकता आहे ती आरएसएसने मांडली पाहिजे.' असेही पटोले म्हणाले. 

"आरएसएसमध्ये सत्य बोलणारे लोकं आहेत त्यांनी सत्य मांडलं पाहिजे. विध्वंसक लोकं, देशाला बरबाद करणारी व्यवस्था ज्या माध्यमातून तयार झाली, त्यावेळेस आरएसएसला आणि केंद्रातील सरकारला ते महिती नव्हतं का? या प्रश्नांची उत्तरे आरएसएस आणि केंद्रातील सरकारने द्यावीत" असे नाना पटोले म्हणाले आहेत .

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.