Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

त्यावेळी का बहिष्कार टाकला नाही? : देवेंद्र फडणवीस

त्यावेळी का बहिष्कार टाकला नाही? : देवेंद्र फडणवीस



मुंबई : खरा पंचनामा

संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला आहे. त्यांच्या या निर्णयाचा मी निषेध करतो. विरोधक म्हणजे खुर्चीचे व्यापारी आहेत. त्यांच्याकडे ना निती आहे ना नेता. हे सत्ता आणि खुर्चीसाठी एकत्र येतात. यापूर्वी देशातील विधिमंडळ व संसदेतील अंतर्गत इमारतीचे उद्घाटन तत्कालिन सत्ताधारी नेत्यांनीच केले होते, असे स्पष्ट करत त्यावेळी का बहिष्कार टाकला नाही, असा प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गुरुवारी माध्यमांशी बोलताना उपस्थित केला.

देशाच्या नवीन संसद इमारतीचे उद्घाटन २८ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. नव्या संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते व्हावे, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. तृणमूल काँग्रेस, राजद, संयुक्त जद, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट या पक्षांसह १९ हून अधिक विरोधी पक्षांनी उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे.

विरोधकांच्या बहिष्कारबाबत बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, त्यांना मोदींची लोकप्रियता पाहवत नाही. नरेंद्र मोदी यांचा मुकाबला करता येणार नाही, याची त्यांना जाणीव आहे. त्यामुळेच विरोधी पक्ष राजकारणासाठी हे सर्व करत आहेत. संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकणे म्हणजे लोकशाहीला नाकारण्या सारखच आहे. महाराष्ट्र विधानसभेचे उद्घाटन तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते झाले त्यावेळी तत्कालिन राज्यपालांच्या हस्ते हे उद्घाटन का केले नाही. 

संसदेच्या एनेक्स इमारतीचे उद्घाटन तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते झालं, संसदेच्या ग्रंथालयाचे उद्घाटन तत्कालिन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते झाले तेव्हा राष्ट्रपतींची आठवण का झाली नाही. तेव्हा बहिष्कार का टाकला नाही, असे प्रश्नही यावेळी फडणवीस यांनी विरोधकांना केले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.