Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

खंडणी मागणाऱ्या तथाकथित पत्रकारांवर पोलिसांचा गोळीबार गाडी अंगावर घालण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांचे प्रत्युत्तर

खंडणी मागणाऱ्या तथाकथित पत्रकारांवर पोलिसांचा गोळीबार
गाडी अंगावर घालण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांचे प्रत्युत्तर



पुणे : खरा पंचनामा

पुण्यातील खराडीमधील इ ऑन आयटी पार्क  येथे सॉफ्टवेअरचा व्यावसाय करणाऱ्याकडे 5 कोटी रूपयांची खंडणी मागणाऱ्यांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न खंडणीबहाद्दरांनी केला. प्रसंगावधान राखत गुन्हे शाखेतील पोलिसांनी खंडणीबहाद्दरांवर गोळीबार केला असता गोळी खंडणीबहाद्दरांच्या गाडीच्या पाठीमागील चाकांवर गोळी लागली आहे. दरम्यान, खंडणीबहाद्दर हे तथाकथित पत्रकार असल्याचे समजते. ही घटना गुरूवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पाटस टोल नाक्याच्या जवळ घडली आहे. 

महेश सौदागर हनमे (रा. सोलापूर) आणि त्याचा साथीदार दिनेश हनमे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ऑगस्ट 2022 पासून खराडी येथील इ ऑन आयटी पार्कमधील सॉफ्टवेअर व्यावसायिक यांच्याकडे संशयित खंडणी मागत होते. त्यांनी तब्बल 5 कोटी रूपयांची खंडणी मागितली होती. आतापर्यंत व्यावसायिकाने त्यांना 3 लाख 80 हजार रूपये दिलेले आहेत. दरम्यान, हनमे याच्याकडून वेळोवेळी पैशाची मागणी होत होती. महेश सौदागर हनमे हा स्वतः पत्रकार असल्याचे सांगत होता. त्याने फिर्यादीची बदनामी करण्याच्या उद्देशाने वगेवगळ्या खोट्या बातम्या तयार करून त्या बातम्या व्हॉट्सअॅपवर विविध लोकांना पाठवून पोलिस केस करण्याची धमकी दिली होती.

दरम्यान, आज महेश हनमेने व्यावसायिकास
कुठल्याही परिस्थिती 50 लाख रूपये हवे आहेत अशी धमकी दिली होती. त्यासाठी त्याने त्यांना सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील हॉटेल स्वराज येथे बोलावले होते. व्यावसायिकाने याबाबतची माहिती गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना दिली होती. 

पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ  निरीक्षक प्रताप मानकर, उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण पथकासह त्यांच्या मागावर होते.

पोलिस आपल्या मागावर असल्याची चाहूल संशयितांना लागली. पाटस टोल नाक्याजवळ पोलिस गेले असता तेथे त्यांनी पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण यांनी प्रसंगावधान राखत आरोपींवर गोळीबार केला. गोळ्या गाडीच्या पाठीमागील टायरवर लागल्या आहेत. पोलिसांनी पाठलाग करून महेश सौदागर हनमे आणि दिनेश हनमे यांना ताब्यात घेतले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.