Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

तर तिरंग्याखाली स्पर्धेत सहभागी होता येणार नाही!

तर तिरंग्याखाली स्पर्धेत सहभागी होता येणार नाही!



नवी दिल्ली : खरा पंचनामा

युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने भारतातील परिस्थितीबद्दल अनेक महिन्यांपासून मोठ्या चिंतेने पाठपुरावा केला आहे. जेथे कुस्तीपटू भारतीय कुस्ती महासंघच्या अध्यक्षांकडून गैरवर्तन आणि छळ केल्याच्या आरोपांबद्दल निषेध करत आहेत. पण, या शेवटच्या दिवसातील घटना अधिक चिंताजनक दिसली. कुस्तीपटूंना पोलिसांनी अटक करून तात्पुरते ताब्यात घेतले. एक महिन्याहून अधिक काळ ते ज्या ठिकाणी आंदोलन करत होते ती जागाही अधिकाऱ्यांनी मोकळी केली आहे. कुस्तीपटूंना दिलेल्या वागणुकीचा आणि अटकेचा जागतिक संघटना ठामपणे निषेध करते, असे संघटनेने म्हटले आहे.

आतापर्यंतच्या तपासाचे निष्पन्न न झाल्याबद्दल ते निराशा व्यक्त करते. जागतिक संघटनेशी संबंधित अधिकाऱ्यांना या आरोपांची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याचे आवाहन करते. या प्रकराबाबत चौकशी करण्यासाठी लवकरच बैठक बोलावली जाणार असल्याचेही संघटनेने स्पष्ट केले. 

भारतीय ऑलिम्पिक संघटना आणि भारतीय कुस्ती महासंघाची प्रभारी समिती यांना संघटनेच्या निवडणूकीसंदर्भात माहिती देण्याची आम्ही विनंती करतोय त्यासाठी आम्ही 45 दिवसांची मुदत त्यांना देत आहोत, या मुदतीत निवडणूक न झाल्या, भारतीय कुस्ती महासंघावर निलंबनाची कारवाई केली जाईल आणि भारतीय खेळाडूंना तिरंग्याखाली सहभाग घेता येणार नाही. त्यांना तटस्थ झेंड्याखाली खेळावे लागेल.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.